Wednesday, January 4, 2023

बोथी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन

 राणीसावरगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हे विशेष वार्षिक शिबिर बोथी येथे 6 जानेवारी २०२३ ते 12 जानेवारी २०२३ या दरम्यान होणार आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    गंगाखेड तालुक्यातील बोथी येथे ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी एक वाजता शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णा भैय्या शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. तर उद्घाटक म्हणून तहसीलदार गोविंद येरमे, प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ. नारायण कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक मल्लिकार्जुन करजगी, सरपंच केसरबाई जुबरे यांची उपस्थिती राहणार आहे. 
    दुसऱ्या सत्रात दोन ते चार या वेळेत ह भ प विलास महाराज गेजगे यांचे "समाज प्रबोधन" या विषयावर कीर्तन होणार आहे.  ७ जानेवारी 2023 रोजी "उद्योगातील संधी आणि शासकीय योजना" या विषयावर प्रकल्प अधिकारी शंकर  पवार यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात माजी प्राचार्य डॉ दिनानाथ फुलवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनात अनेक कवीचा समावेश होणार आहे. 8 जानेवारी २०२३ रोजी माधवबाग, उदयगिरी लायन्स क्लब तर्फे "आरोग्य तपासणी शिबिराचे" आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अंजना कुंडगीर यांच्या हस्ते होणार आहे.  9 जानेवारी 2023 रोजी "भारतीय संविधान" या विषयावर आनंद इंजेगावकर यांचे भाषण होणार आहे.  दुसऱ्या सत्रात प्रा.विजयकुमार सोनर यांचे "नव मतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे.
     "बालविवाह प्रतिबंध" या विषयावर महिला व बाल विकास अधिकारी तिडके यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 10 जानेवारी 2023 रोजी "निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण' या विषयावर  पी. आर. सुर्वे, डॉ. धनपाल चव्हाण, डॉ एस. पी. खंदारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर दुसऱ्या सत्रात मधुकर उमरीकर हे श्यामची आई हे एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. ११ जानेवारी 2023 रोजी "स्वच्छता अभियान आणि शिक्षण" या विषयावर सामाजिक कार्यकर्ता कृष्णाबाई इंगळे, नरसिंग धोट यांचे भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात "शिक्षण आणि विद्यार्थी विकास" या विषयावर प्रकाश नानोर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात प्रा. दिपाली पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.12 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस अधिकारी घोगरे, प्रमुख वक्ते डॉ. गौरव जेवळीकर, प्रमुख पाहुणे डॉ. संतराम मुंडे, डॉ. तुकाराम फीसफिसे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आव्हान प्र. प्राचार्य डॉ विठ्ठल डुमनर, कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत सरवदे, डॉ. विश्वनाथ रासवे,उपसरपंच विजयमाला गेजगे, ग्रामसेवक प्रशांत कांबळे, तलाठी चंद्रकांत साळवे, पोलीस पाटील नारायण आडे,डॉ रेणुकादास बोन्नर, डॉ, उत्तम देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष भास्करराव ठावरे, रामेश्वर बोनर, मुख्याध्यापक देविदास राठोड, ज्ञानोबा कुंडगीर, शारदा मोटे, मंगल ठावरे, तुकाराम राऊत, राधा चाफेकानडे, अनिल गायकवाड, शिवाजी जाधव, सारजा आडे, शशिकला आडे आदींनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...