Wednesday, July 5, 2023

कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

राणीसावरगाव (प्रतिनिधी):- श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कल्पना जाधव, पोलीस सहाय्यक निरीक्षक विक्रम हराळेरंगनाथ राठोड, संस्थेच्या अध्यक्षा मधुमाला दळणर, संचालिका कोमल बंडगर, प्राचार्य विठ्ठल डुमनर,शिवाजीराव मोहिते, देविदास गोरे,गंगाधर पवार,भागवत बाजगीर, साधुजी हाके,मुख्याध्यापक किशनराव रोडे आदींची उपस्थिती होती.
 यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी शिवाजीराव दळणर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पक्षाच्या वतीने पुष्पहार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच कृष्णा डोणे, पवन विश्वनाथ राठोड, कार्तिका गंगाधर खांडेकर,तपस्या ज्ञानेश्वर कोंडामंडळे,गायत्री सुग्रीव हाके, प्रज्ञा देवानंद साळवे, ज्ञानेश्वर शंकर माने, श्वेता अंगत  गुटे,आदर्श विनोद साळवे,आयान अफजल पठाण, संध्या विजयानंद घोबाळे,अक्षदा रामू घाटकेवाड, सुदर्शन मोहन हाके, राजनंदिनी बालाजी  घोबाळे,आरती मुरलीधर जमरे, गोपीनाथ विष्णू धोत्रे,हरिओम विठ्ठल नरवटे, प्रतीक्षा निळकंठ देवकते, अंकिता प्रभाकर हाके,संध्या विजय फुगनर, साक्षी  गरबा जाधव, संगीता मारुती कोरे, शिवानी कदम ,समृद्धी सुग्रीव हाके,दिपाली राम द्वारकेवार यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थी साक्षी शंकर राठोड, समीक्षा बालाजी बलांडे, अब्दुल रहमान माजिद खान, संस्कार शंकर रेवणवार,धीरज शंकर राठोड, प्रज्ञा भगवान इमडे,वैष्णवी नामदेव डूमनर,ज्योती दिगंबर हाके, अंकिता वामन नरवड, शिवप्रसाद सिद्धेश्वर साल मोठे, शिवानी हनुमंत पल्लेवार, पवन सत्यनारायण दुबे, अमरनाथ शहाजी शिंदे, सुमित ज्ञानोबा जाधव, वैष्णवी रमेश सलगर, आकांक्षा बालाजी तुडमे, फरीद नवाज शेख, अमोल राजेभाऊ राठोड, मुकुंद प्रकाश पांढरे,मनीषा बालाजी चिट्ट, शंकर सर्जेराव खांडेकर,अभिजीत धनराज कदम, रितेश शिंदे, विशाखा विष्णुदास मोठे, पूनम माधव इमडे,निळोफर इब्राहिम पठाण, अंजली अंगत करले, इरफान इस्माईल पठाण,ज्ञानेश्वरी मारुती कोरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनायक दालपे यांनी केले तर आभार व मनोगत शिक्षक धनंजय बने यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. 



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...