![]() |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात
दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी
सकाळी 10:00 वाजता मोफत माधवबाग यांच्याकडून आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. यात हृदयाचे ठोके,रक्तदाब, छातीची पट्टी,वजन तपासणी, शरीर तापमान
तपासणी, रक्तातील
साखरेचे प्रमाण तपासणी, वैद्यकीय व आहार विषयक सल्ला देण्यात येणार आहे, त्याचबरोबर मोफत
रक्त तपासणी केली जाणार आहे. उदयगिरी लायन्स क्लब यांच्या वतीने मोफत नेत्र
तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी
एक ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कीर्तनकार ह भ प
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन सायंकाळी 9 वाजता होणार आहे. या कीर्तनात मृदंगाचार्य राम महाराज काजळे, मृदंगसम्राट हभप
प्रमोद महाराज चोंडीकर, संगीत विशारद पप्पू महाराज पोले,गणेश महाराज
माळेगावकर उपस्थित राहणार आहेत, वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आव्हान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस
गंगाखेड विधानसभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ गंगाखेड
तालुक्याचे अध्यक्ष तथा युवा नेते कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment