परभणी (प्रतिनिधी):- येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर शिवाजी विठ्ठलराव दळणर सर स्मृती पुरस्कार विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणार आहे. स्वर्गीय डॉ. शिवाजीराव दळणर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विविध प्राधिकरणावर काम केले आहे. तसेच शिक्षणक्षेत्रामध्ये दीर्घकाल काम पाहिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही अनेक वर्षे काम केले. श्रमजीवी समाज कल्याण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जालना जिल्ह्यातील मत्सोदरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. राजकीय पक्षाच्या वरच्या पदावर त्यांनी काम केले. त्याचबरोबर साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून वक्तृत्वाची चांगली जाण त्यांना होती. वरील सर्व अनुभवाची व कार्याची जाण म्हणून विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर स्मृती पुरस्कार व रोख रक्कम दिली जाणार आहे. विद्यापीठ पुरस्कारासाठी ठेव म्हणून 51 हजार रुपयांचा चेक संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांनी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांना दिला त्यांच्या कार्याबद्दल कृष्णा दळणर यांची सर्व सर्वत्र कौतुक होत आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...
No comments:
Post a Comment