Saturday, February 11, 2023

होळकर महाविद्यालयात युवातरंग वार्षिक स्नेहसंमेलन रंगले..



      

राणीसावरगाव (प्रतिनिधी): येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक संस्थेचे  युवातरंग वार्षिक स्नेहसंमेलन 2023 अतिशय उत्साहात संपन्न झाले. 
    या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नुकतेच  संस्थेचे सचिव  कृष्णाभैया शिवाजीराव दळणर, ड. रंगनाथ राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक दिगंबर नाना हाके , कोमल दळणर, प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमणर, मुख्याध्यापक किशन रोडे, तादुळवाडीचे सरपंच दिगांबर हाके हे मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळा महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी  विविध कलाप्रकाराच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा अविष्कार घडविला तर दुपारच्या सत्रात प्रसिद्ध हास्य कवी शीलवंत वाढवे यांचा हास्यरंगारंग हा कार्यक्रम संपन्न झाला
     त्यांनी आपल्या शैलीत तरुणांना भरपूर मनोरंजन करीत भरपूर हसविल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लावणी लोकनाट्य देशभक्तीपर अनेक गीते भांगडा नृत्य असे विविध कलाप्रकार सादर केले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे भारदार सूत्रसंचालन सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले तर दुपारच्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष हंकारे यांनी केले तर विविध कला गुणदर्शन या कार्यक्रमाचे संचालन सहशिक्षक प्रकाश नानोर, प्राध्यापक डी आय पठाणप्रा. डॉ. नर्सिंगदास बंग, प्रा. डॉ. दिपाली पांडे  यांनी केले.
    या वार्षिक स्ने संमेलनासाठी पालक पंचक्रोशीतील अनेक नागरिक तसेच शाळा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ. दिपाली पांडे व स्नेह समेलन, समितीचे अध्यक्ष सहशिक्षक विनायक दालपे, संगिता उध्दराव होनमने,सहशिक्षक आत्माराम सोनकांबळे, सहशिक्षक एकनाथ जोशी  आदिनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...