Wednesday, August 2, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 राणीसावरगाव  (प्रतिनिधी):-   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी व लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
     या वेळी संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना डॉ. संतोष हंकारे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे पहिले शिवशाहिर आहेत.  त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती सातसमुद्रापार पोहचवली. फक्त दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या,त्यात फकीरा हि त्यांची सर्वोत्तम कादंबरी होत. पुढे त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला. त्यांनी लिहिलेले साहित्य पोवाडे,गीते,लोकनाट्य, लावण्या आदीवर विद्यापिठात मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे.  या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे यांनी आभार मानले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. शंकर घाडगे यांनी केले. या वेळी डॉ. सारिका केदारे, प्रा सुर्यकांत फाटके, प्र. प्राचार्य नरसिंगदास बंग,डॉ. श्रीहरी चव्हाण, डॉ. अंगद गडमे, प्रा. कल्पना तायवाडे, डॉ. दिपाली पांडे,प्रा. डॉ कपिल लामतुरे व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.    

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...