Thursday, August 3, 2023

होळकर महाविद्यालयात ५ ऑगस्टला क्रांस कंट्री स्पर्धा

 

    राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन ड झोन क्रॉस कंट्री स्पर्धा 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ७::०० वाजता घेण्यात येणार आहे.या स्पर्धेचे उद्घघाटन संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांचे  करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे उपस्थिती राहणार आहे. विजेत्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. माधव शेजुळ यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.  या स्पर्धेचे मार्ग राणीसावरगाव - घटांग्रा  चौक  - दामपुरी पर्यंत राहणार आहे. हा मार्ग सहा किलोमीटर एवढा आहे. स्पर्धेला जास्तीत जास्त संघाने सहभाग घ्यावा, असे आव्हान प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमनर यांनी केले आहे. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...