आंतरमहाविद्यालय ‘ड’ झोन क्रॉस कंट्री स्पर्धेत होळकर महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद
परभणी (प्रतिनिधी):- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील
यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑगस्ट 2023 रोजी आंतरमहाविद्यालय ‘ड’ झोन क्रॉस कंट्री स्पर्धा
घेण्यात आली आहे. या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह सांघिक विजेतेपद मिळाला
आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत दरवर्षी क्रीडा
स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला
क्रॉस कंट्री स्पर्धेचा मान मिळाला आहे. त्यानुसार 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सात वाजता आंतरमहाविद्यालय ‘ड’ झोन क्रॉस
कंट्री स्पर्धा सुरुवात झाली. या स्पर्धेला हिरवा झेंडा सहाय्यक पोलीस निरीक्षक
विक्रम हराळे, संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या
शिवाजीराव दळणर, प्रभारी प्राचार्य डॉ.
विठ्ठल डुमनर, डॉ. माधव शेजुळ यांनी
दाखविला. त्यानंतर खेळाडू स्पर्धेत तयार झाले. या स्पर्धेचा रूट पिंपळदरी कमानी
पासून सहा किलोमीटर जाणे व सहा किलोमीटर येणे असा एकूण बारा किलोमीटर एवढा होता.
ही स्पर्धा हिंगोली, परभणी महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम -सचिन रोहिदास पवार, द्वितीय -मंजनर मयूर हनुमंत, तृतीय- विशाल रामेश्वर घाडगे हे सर्व पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव यांनी मिळविला. तर मुलीमध्ये प्रथम क्रमांक -राणी राठोड, द्वितीय -भीमा इंगळे, योगदानंद महाविद्यालय, तृतीय जाणका जिलेवाढ यांनी मिळविला. तर सांघिक
विजेतेपद प्रथम क्रमांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव व
द्वितीय क्रमांक सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय यांना मिळाला आहे. विजेते
खेळाडूंचा सत्कार सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर,डॉ. माधव शेजुळ,
डॉ. मीनानाथ गोमचाळे, डॉ. विनोद गणाचार्य,डॉ. घुगे, डॉ. गुरुदास लोकरे,डॉ. विठ्ठल डुंमनर यांनी केला. सत्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ,मेडल आणि प्रमाणपत्र
असा होता. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. उत्तम देवकते यांनी केला.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.
तुकाराम बोबडे यांनी केले तर आभार प्रा.
दुलेखा पठाण यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम
केले.

No comments:
Post a Comment