Thursday, August 10, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात “माझी माती माझा देश” अभियानाची सुरवात

     


        राणीसावगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन आणि राज्य शासनयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी माती माझा देश या अभियानाची सुरवात दिनांक ०९/०८/२०२३ रोजी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

        या वेळी उपस्थितांना पंचप्रण शपत देण्यात आली.या प्रसंगी प्राचार्य डॉ विठ्ठल डूमणर, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी  डॉ विश्वनाथ रासवे,डॉ वसंत सरवदे,डॉ तुकाराम बोबडे,प्रा पि पि मरेवाड, प्रा डी आय पठाण,प्रा प्रकाश चौधरी,डॉ बालाजी शिंदे. व प्रशासकीय कर्मचारी तसेच रा से यो चे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

    अभियाना अतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी कार्यक्रम अधिकारी डॉ विश्वनाथ रासवे यांनी मार्गदर्शन केले.तसेच देशाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशिल राहावे असा या अभियाना मागचे उद्देश आहे. भारताची यशोगाथा सर्वसामान्य लोकापर्यत पोहचण्यासाठी हे अभियान महाविद्यालयात स्तरावर राबविण्यात यावे असे निर्देश भारत सरकार कडून करण्यात आले आहे. ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार आहे. त्या मध्ये भिंत्तीपत्रक,देश भक्तीपर गित,गायन स्पर्धा,वृक्षरोपण,निबंध स्पर्धा,परिसरातील विरांचा संमान,भुमातेला नमन,रली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबिवण्यात येणार आहे.तेव्हा महाविध्यालयातील सर्व  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये  उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ विठ्ठल डूमणर यांनी केले.   



     

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...