राणीसावरगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समितीच्या वतीने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल डुबनर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर उत्तम देवकते डॉक्टर तुकाराम बोबडे प्राध्यापक प्रकाश चौधरी समन्वयक डॉक्टर नर्सिंगदास बंग आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व कर्मयोगी डॉ. शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वृत्तपत्रविद्या विभागाकडून प्रकाशित करण्यात येणारा कर्मयोगिनी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. दिपाली पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी किरण राठोड, राजश्री पांचाळ यांनी स्वागत गीत सादर केले. उपस्थित पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते प्रस्ताविक करताना डॉ. बंग म्हणाले," पालकांनी आपल्या पाल्यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी महाविद्यालयात आला पाहिजे याची तळमळ असल्याने हा पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात पाठविणे आवश्यक आहे. जो विद्यार्थी महाविद्यालयात येतो त्याच विद्यार्थ्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. उत्तम देवकते यांनी संस्था व महाविद्यालयाचा इतिहास, उद्देश, महाविद्यालयातील विविध उपक्रम घेतले जातात असेही त्यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment