Monday, September 11, 2023

मेरी माती मेरा देश अंतर्गत माती गोळा करण्याचा उपक्रमाला उदंड प्रतिसाद

 राणीसावरगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अंतर्गत विद्यार्थी, पालक प्राध्यापकांनी एक मूठ माती घेऊन वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. 


या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर,प्रभारी प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमनर, इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. तुकाराम बोबडे आदींची उपस्थिती होती. महाविद्यालयात एक सप्टेंबर ते १५ सप्टेंबर 2023 पर्यंत "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये  वृक्षारोपण,९ पंचप्रण, युवा संवाद आदी कार्यक्रम घेण्यात आले. त्याच धर्तीवर महाविद्यालयातील विद्यार्थी,पालक, शिक्षक यांनी "एक एक मूठ माती" घेऊन वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच सेल्फी किंवा फोटो काढण्यात आला. या मातीचा कलश तयार करून जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे. हा सेल्फी किंवा फोटो काढून सदरील लिंकवर स्वतः डाऊनलोड करण्याचे आव्हान राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृत्तपत्र विद्या विभागाचे डॉ. कैलास लामतुरे यांनी केले तर आभार डॉ. संतोष हंकारे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...