Monday, September 18, 2023

होळकर महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा

राणीसावरगाव ( अनुराधा बिडगर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात भुगोल विभागाच्या वतीने  जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. या कार्यमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल डूमणर व डॉ उत्तम देवकात्ते हे होते.


या वेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व कर्मयोगी शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी डॉ सिंदू खंदारे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.तसेच भुगोल विषयातील बी ए तृतीय वर्षातील  गुणवंत विद्यार्थी शेख रेशमा,मंगल जोमदे यांचा सत्कार भुगोल विभाग व संस्थेचे सचिव  कृष्णाभैया दळणर यांनी केला. चांद्रविजय  भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत भुगोल विभागप्रमुख प्रा .डॉ. सिंधू खंदारे  यांनी जागतिक ओझोन दिनाचे महत्व व ओझोन वायूच्या कमतरतेमुळे भविष्यात निर्माण होणारया  समस्या यावरती प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ उत्तम देवकते यांनी बोलताना म्हणाले, ओझोन वायूचे  रक्षण करणे हे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे,प्लास्टिक न वापरणे,पिण्याच्या पाण्याचे योग्य  नियोजन करणे, या सारख्या अनेक विषयावर लक्ष वेधले.अध्यक्षिय  भाषणात संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर म्हणाले जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यामागील संकल्पना केवळ लोकांना ओझोनच्या थराविषयी जागरूक करणे आणि ऱ्हास   झालेल्या ओझोन थराची जाणीव करून देणे हा आहे. जर लोकांनी प्रदूषण कमी केले तर ओझोन थराला नुकसान होण्यापासून वाचवता येईल. तसेच भारतीय अंतराळ संस्थाने चांद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताचे नाव लौकिक केल्या बद्दल सर्व संशोधकांचे आभार व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विध्यार्थिनी शिल्पा इमडे यांनी केले.आभार विध्यार्थिनी अनुराधा बिडगर यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालायातील प्राध्यापक ,विद्यार्थी  व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते .


   

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...