Saturday, September 23, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विद्यार्थी मेळाव्याला उदंड प्रतिसाद

 

राणीसावरगाव (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समितीच्या वतीने विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल डुमनर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अंगद गडमे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ रासवे, डॉक्टर नर्सिंगदास बग, डॉक्टर तुकाराम बोबडे यांची उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर संगीत विभागातील विद्यार्थिनी कुमारी किरण राठोड व राजश्री पांचाळ यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील वेबसाईटचे उद्घाटन झाले. 
    डॉ.गडमे," म्हणाले आजच्या युगात जो विद्यार्थी वाचन संस्कृती पाळतो तोच विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला पाहिजे. धरसोड केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित आले पाहिजे तसेच शिष्यवृत्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी जागृत राहावे, शासन सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असेही डॉ. अंगद गडमे यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर रासवे म्हणाले," विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास साध्य केले पाहिजे त्यासाठी चांगल्या प्राध्यापक मित्र मंडळात राहणे आवश्यक आहे. आपली मने ही वाईट किंवा चांगली ठरवण्याची ज्या विद्यार्थ्यांची क्षमता आहे तो विद्यार्थी  भविष्यात यशस्वी होतो. मने ही भटकंती असतात. त्यावर आपला ताबा असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नियमित पालक व गुरुचे मार्गदर्शन घेऊन नियमित महाविद्यालयात येण्याचे आव्हान केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये घेण्यात येत आहेत. त्याचा फायदा नोकरी व आपल्या फिटनेससाठी उपयोगी पडतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सतर्क राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 
    यावेळी डॉ. डूमनर म्हणाले," नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य कसे राहते त्यांचे उदाहरण सांगितले. मार्गदर्शना शिवाय विद्यार्थी घडत नाही. मला काही येत नाही, समजत नाही म्हणून विद्यार्थी येत नाहीत हे चुकीचे आहे. नियमित तासिका करू लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विकासाची व अभ्यासाची गोडी लागते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृष्णा दळणर म्हणाले," उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणखीन विद्यार्थ्यांना सोयी पाहिजेत असल्या तर आपण ते पुर्ण करू मात्र याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे,असेही आवाहन   त्यांनी केले. 
    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर बंग यांनी विद्यार्थी मेळावाचा उद्देश विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग करून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. शंकर घाडगे यांनी केले तर आभार संगीत विभागाच्या विभाग प्रमुख दिपाली पांडे यांनी मांनले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...