Friday, September 22, 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त होळकर महाविद्यालयात विविध स्पर्धा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर गणेश माने यांचे व्याख्यान

राणीसावरगाव(प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दिगंबर हाके, रंगनाथ राठोड, प्रभारी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल डूमनर, मुख्याध्यापक किशन रोडे, डॉ. गणेश माने आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, कर्मयोगी शिवाजी दळणर, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सचिव कृष्णा भैया दळणर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आला आहे.  संगीत विभागाच्या प्रमुख डॉ दिपाली पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी किरण राठोड, भाग्यश्री पांचाळ यांनी विद्यापीठ गीत राष्ट्रगीत, वंदे मातरम गीत सादर केले. यावेळी निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर माने," म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामांची सत्ता संपली आणि ती  भारताचा एक भाग बनला आहे. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा अशी हाक स्वामी रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम  होऊन नागरिक संग्रामात सहभाग घेऊ लागले. त्यांनी विचारांचा प्रसार करण्यासाठी व्हिजन हे साप्ताहिक ही सुरू केले होते असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभागाचे डॉ. नर्सिंगदास बंग यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...