राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्यावतीने युवातरंग वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित होते. यावेळी शाळेतील व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विविध कलाप्रकार सादर केले त्यामुळे हे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले..!
शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
हे संमेलन दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर हे उपस्थिती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, संस्थेच्या संचालक शिवानी दळणर, संचालक रंगनाथ राठोड, दिगंबर हाके, प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमनर, मुख्याध्यापक किशन रोडे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि संस्थापक कर्मयोगी शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये निर्जन गिरी, राजनंदनी नांदुरी, समीक्षा काळे, आरती जाधव, आकांक्षा भवनुरे, ऋतुजा सलगर यांनी “मैने पायल है धनकाई” या गाण्यावर नृत्य केले तर “धीमी धीमी नाच” या बंजारा गीतावर ऋतुजा सलगर, आरती जाधव, समीक्षा काळे, शिवानी दुधाटे, निर्जला गिरी, दिव्या जाधव यांनी नृत्य केले तर “गणनायक गणदेवताय” या भक्ती गीतावर दिव्या डुमनर, अनुजा कवडे, ज्योती पोळ, आयेशा पुरी, कोमल राठोड, दिव्या जाधव यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर “मेरे आखो काजल” या गीतावर अंकिता कुंडगीर, ज्ञानेश्वरी नरवटे, माया सुरनर, अंकिता कवडे, वैष्णवी कवडे यांनी नृत्य सादर केले. “थंडी वाजली मला गोधडी द्या” या गीतावर अनुजा कवडे, ऋतुजा कवडे, ज्योती पोळ, आकांक्षा यशराज मिरगे, वैभव यमगर, प्रतीक टाले, जुनेद तांबोळी यांनी नृत्य केले. “ मेरे घर राम आहे हे” या भक्ती गीतावर वैष्णवी हाके, संध्या घोबाळे, साक्षी फुगणर, अंकिता पांढरे, पल्लवी हाके, भाग्यश्री केरले, इंद्रायणी तनुजा केंद्रे यानी आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली. वैष्णवी गिरी, अक्षदा द्वारकेवार, साक्षी फुगणार, सोनम धंदेवाड, गीता हाके, वैष्णवी हाके, अक्षता घोगरे यांनी “मी अहिल्या होणार” हे प्रेरणादायी गीत सादर केले. “दिलबरा ग तू माझी दिलबरा ग” या गीतावर श्रावणी घोगरे, तपस्या कोंडामंडळे, कल्याणी मंगळे, समृद्धी हाके, सुजाता डुमनर, तक्षशिला देवकते, प्रथमेश हाके, संतुटी हाके, कृणाल भोसले, अर्णव साळवे, गणेश भुगनर, माऊली नरवटे यांनी बहारदार असे नृत्य सादर केले. “मी हाय कोळी” या सामूहिक गीतामध्ये विद्यार्थी सूर्या काजळे, अक्षदा घोगरे, वैष्णवी हाके, शामका चव्हाण, प्रणिता जाधव, शुभम धरणी, रामेश्वर चव्हाण, अर्जुन राठोड, आकाश राठोड, विद्यासागर जगतकर यानी नृत्य सादर केले तर “सुनो गोरसे दुनियावालो” या गाण्यावर काजळ नरवड, भक्ती दुभाष, श्रीहरी बाबर, प्रणिता जाधव, संस्कृती पवार, समीक्षा मेकाले यांनी नृत्य केले. विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध चित्रपटातील भक्ती,गीत, नाटिका सादर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विविध गाणी सादर करून प्रेक्षकांची मनी जिंकली आहेत. वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कल्याण कदम यांची उपस्थिती होती. कवी कदम यांनी आपले अनुभव सांगितले आणि आपल्या बहारदार कवितेचे सादरीकरण केले या वार्षिक स्नेहसंमेलन परीक्षक म्हणून प्राध्यापक अभय पाटील, शिवशंकर डोइजड, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सकाळच्या सत्रात
प्रा. डॉ. संतोष हंकारे, प्रा. डी.आय. पठाण यांनी केले तर दुपार सत्रामध्ये डॉ. तुकाराम बोबडे, डॉ. दिपाली पांडे यांनी केले तर समारोप सत्रामध्ये सूत्रसंचालन विनायक दालपे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक किशन रोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.


.jpeg)

No comments:
Post a Comment