Tuesday, February 13, 2024

स्पर्धा हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अंग असावा- डॉ.गुडदे

 परभणी (प्रतिनिधी):-  एकविसव शतक हे स्पर्धच शतक आहे, जो विद्यार्थी स्पर्धशी लढतो तोच विद्यार्थी  घडतो, घडविण्यासाठी स्पर्धा हे विद्यार्थ्यांचा जीवनाचा अंग असावा लागतो, असे प्रतिपादन डॉ. कालिदास गुडदे यांनी केले. 

    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल डूमनर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कालिदास गुडदे, डॉ. नर्सिंगदास बंग, डॉ. तुकाराम बोबडे, डॉ.  अंगद गडमे डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ. उत्तम देवकते, डॉ. वसंत सरवदे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यासह विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील मेन गेट ते सभागृहापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्वामी रामानंद तीर्थ आणि संस्थापक डॉ. शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी गुडदे म्हणाले,”शिक्षण कमकुवत होते, तेव्हा राष्ट्र हुकूमशाकडे जाते. त्याचा इतिहास आहे. मानवाच्या शरीराला मृत्यू आहे, मात्र त्यांच्या विचाराला मृत्यू नाही. तीर्थयात्रा बंद करून ग्रंथालय सुरू केल्यास भारताचा खरा विकास होऊ शकतो मात्र आजच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडे पाठ फिरवली आणि मोबाईलची मैत्री केली ही धोक्याची घंटा आहे. ही धोक्याची घंटा टाळण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट पासून दूर राहिले पाहिजे. ज्ञान मिळविण्यासाठी जिज्ञासा, तळमळ विद्यार्थ्यांना हवी. ज्ञान हे कुठेही मिळत नाही ते अभ्यास करूनच प्राप्त होते म्हणून ज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. अभ्यास व परीक्षेशिवाय पदवी मिळत नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक परीक्षा प्रमुख डॉ. नर्सिंगदास बंग यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. विठ्ठल डूमनर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉ. शंकर घाडगे यांनी केले तर आभार डॉ. तुकाराम बोबडे यांनी मांनले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक आणि शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...