Thursday, February 15, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी

 परभणी( प्रतिनिधी):-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व हिंदी विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयकुमार सोन्नर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीहरी चव्हाण. डॉ.  नर्सिंगदास बंग, कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी डॉ. चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला  

 गोलार दोडी तांडा ता.गुंटी, जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात भीमा नायक रामावत व आई धर्मानी यांचाकडे झाला. भीमा नाईक यांना चार मुलं होते त्यात सेवालाल हे ज्येष्ठ होते. संत सेवालाल हे लहानपणा पासून विरक्त स्वभावाचे होते.  संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. त्यांनी मानव कल्याणाचा, मानवतेचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ते  निजामाशी लढले.तसेच अनिष्ट रूढी आणि शोषणाविरुद्ध वाणीतून सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रहार केला. त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर साजरी केली जाते. बंजारा समाजाचे महान  दैवत संत सेवालाल महाराज हे अन्नपद भटक्या जातीचे मार्गदर्शक, समाजसुधारक व क्रांतिकारक भगवंत होते.संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज एक महापुरुष आणि पराक्रमी महात्मा होते. हे महान संत आणि थोर समाज सुधारक होते. संत सेवालाल महाराजांनी स्वतःच्या बंजारा बोलीत उपदेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. बालाजी शिंदे यांनी केले तर आभार हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नर्सिंगदास बंग यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक ,शिक्षेत्तर कर्मचारी  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...