राणीसावरगाव (प्रतिनिधी)- राज्याचे अर्थमंत्री तथा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी
बहीण ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली. दर महिन्याला पंधराशे रुपये पात्र
लाभार्थी महिला व युवतीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र
महिला आणि युवती या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठीनोंदणी करावी,
असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष
कृष्णाभैय्या शिवाजीराव दळणर यांनी केले आहे. महायुतीचे सरकार
अनेक लोकपयोगी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील असंख्य महिलाना
लाभ होत आहे, यातून सर्वसामान्य नागरिकांचा उत्कृष होत असून
महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात अनेक लोकप्रिय योजनांची
घोषणा केली. स्त्री- पुरुष समानता निर्माण करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम
करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रम
धोरण योजना राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाने 7 मार्च
रोजी चौथे महिला धोरण जाहीर केले. याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या
आर्थिक पाहणी अहवाला दरम्यान महिला केंद्रित काही योजना जाहीर केल्या आहेत.
त्यानुसार राज्यशासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली.
यामध्ये निराधार निराश्रीत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत आर्थिक दुर्बल, अत्यल्प उत्पन्न
कुटुंबातील महिला, विवाहित महिला, विधवा
महिलासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे
मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ग्रामीण भागात
व्यापक स्वरूपात योजनेची जनजागृती करण्यात येत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
वतीने गावात खेड्यात यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहेत, या योजनेचा लाभ महिलेने घ्यावा, असे आव्हान
राष्ट्रवादीचे यूवा नेते कृष्णा दळणर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment