Monday, February 3, 2025

*युवकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेतले पाहिजे* - कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आव्हान

 परभणी (प्रतिनिधी):-  आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थी भरकटला जात आहे. युवकांच्या हाताला काम नाही त्याचे कारण आजचा विद्यार्थी रोजगारभिमुख शिक्षण घेण्यात कमी पडत आहे तेंव्हा ज्ञानार्जन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी रोजगार मिळविण्यासाठी कौशल्यावर  आधारित शिक्षण घेतले पाहिजे.असे आव्हान कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या स्व. प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर सर  विद्यार्थी महोत्सव- २०२५  वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी  बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड येथील जेष्ठ विधी तज्ज्ञ ॲड. शिवाजीराव हाके हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे, पाथरी विधानसभा आमदार राजेशदादा विटेकर, संस्थेचे सचिव कृष्णा भैय्या शिवाजीराव दळणर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. कांतराव पोले,मुख्याध्यापक किशन रोडे हे उपस्थित होते..


 मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, संस्थापक शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संगीत विभागातर्फे पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना उत्तम राजकारण करायचे असेल तर त्यांनी महाभारत वाचले पाहिजे. त्यातून राजकारणणातील कपटनीती कशा पद्धतीची असते हे लक्षात येईल... उत्तम संसार करायचा असेल तर..रामायण वाचले पाहिजे...त्यातून पती पत्नी, बहीण भाऊ, कसे असतात याची जाणीव होईल.वजीवन जगतांना वागण्यांची, व्यवहारांची कला तुम्हाला शिकायला मिळेल. गुणवंत आणि ज्ञानवंत विद्यार्थी बनयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे, कारण गुरूशिवाय ज्ञान मिळत नाही. जो विद्यार्थी गुरुचा आदर्श करत नाही, तो विद्यार्थी आयुष्यात कधीच प्रगती करत नाही.म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-प्रमाणे शिक्षण घेतले पाहिजे. होतकरू विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. youtube वर 400 च्या जवळपास जागा  उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल अवगत आहे. त्यांनी युट्युब वरती अर्ज केला पाहिजे. देशात खेळाडूंची आवश्यकता आहे. विविध खेळांमध्ये युवकांनी समोर आले पाहिजे. भारतात ऑलम्पिकमध्ये आज आपणास किती कमी पदकावर समाधान मानावे लागते, ही बाब लाजिरवाणी आहे. खेळाडूंची निर्मिती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. ठराविक वयातच वाचन होत असते.म्हणून  वाचनापासून युवकांनी दूर जाऊ नये,असे सांगितले. तसेच दळणर परिवारांचे आणि आमचे जुने नाते, संबंध आहेत. दळणर परिवारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. 

यावेळी आमदार राजेश दादा विटेकर आणि आमदार डॉ. रत्नाकरराव  गुट्टे यांचेही भाषणे झाली. यावेळी अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव कृष्णा भैय्या  दळणर मनाले, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले जात आहे. आमची अनेक वर्षापासून आपणास बोलण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली. आमच्या शब्दाला मान देऊन आपण या कार्यक्रमाला आलात हे आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून ग्रामीण भागातील समस्या, रोजगार, शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांनी मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले तर आभार डॉ. रेणुकादास बोन्नर यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक ,विद्यार्थी,पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...