परभणी (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षणसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर विद्यार्थी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे तर प्रमुख पाहुणे पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड. शिवाजीराव हाके हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षणसंस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार व शाळा , कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांच्या प्रकारचे सादरीकरण होणार आहे. या वार्षिक महोत्सवाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपस्थित रहावे, असे आव्हान सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...


No comments:
Post a Comment