Monday, July 7, 2025

यमन पेक्षा भारतातील महिलांना अधिक स्वातंत्र्य: अल बदाजी

राणीसावरगाव  (प्रतिनिधी):  यमन या देशात  भारताच्या तुलनेत महिलांना अधिक स्वातंत्र्य नाही.यमन देशातील राजकारणात एक टक्काच सहभाग महिलांचा आहे. मात्र भारतातील राजकारणात 33 टक्केच्या जवळपास महिलांना स्वातंत्र्य असल्याचे मत यमन या देशातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार सिंहम दाऊत हसन अल बदाजी यांनी येथे मांडले आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त  "महिला सबलीकरण: भारत व यमन देशातील महिलांची स्थिती" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोन्नर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तुकाराम बोबडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. अंगद गडमे यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अल बदाजी पुढे बोलताना म्हणाल्या,“ यमन या देशात महिलांना भारतासारखे स्वातंत्र्य नाही. भारत आणि यमन मधील महिलांच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. भारताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायदेशीर आणि सामाजिक पाऊले उचलली आहेत. यमन मधील सामाजिक आर्थिक परिस्थिती यादवी युद्ध रूढी परंपरा प्रथा व शिक्षणाचा अभाव हे घटक महिलांच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहेत त्यामुळे तेथील महिलांचा संघर्ष कायमच आहे. येथील महिलांना कठीण परिस्थितीत जगावे लागते. यमन मधील युद्धांची परिस्थिती ही महिलांच्या जीवनावर परिणामकारक करणारी आहे. येथील सामाजिक आणि धार्मिक रूढी परंपरा कायमच आहे. भारत सरकारने महिलांना सक्षमीकरणासाठी अनेक कायदे आणि योजना लागू केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, राजकीय सहभाग सारख्या क्षेत्रांमध्ये महिलांनी लक्षणीय प्रगती केली आहे. यमन मधील अजूनही सामाजिक रूढी, लिंग, भेदभाव ही आव्हाने आहेत.  याउलट यमन हा एक संघर्षग्रस्त देश असून येथे महिलांना मूलभूत हक्काचा अभाव मर्यादित सामाजिक आणि कायदेशीर अधिकार तसेच शिक्षण आरोग्याच्या सुविधांची कमतरता अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. युद्धामुळे त्यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. तुकाराम बोबडे, प्राचार्य आर.वाय. बोनर, कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची व्याख्याने झाली. या कार्यक्रमचे सूत्रसंचलन तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. कल्पना तायवडे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. अंगद गडमे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने हजर होते.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...