Wednesday, July 2, 2025

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नाईक यांचे योगदान: डॉ चव्हाण



राणीसावरगाव (प्रतिनिधी): आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे महत्त्वाचे  योगदान असून. शेती पिकली पाहिजे आणि मुले शिकली पाहिजे असा ध्यास घेऊन त्यांनी हरितक्रांती घडून आणली. असे प्रतिपादन डॉ. श्रीहरी चव्हाण यांनी केले आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाचे श्रीहरी चव्हाण, डॉ. विजयकुमार सोन्नर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. या वेळी निवड केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. अंगद गडमे व प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून निवड झालेले विजयकुमार सोन्नर तसेच आजी-माजी कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या वेळी चव्हाण म्हणाले," नाईक यांच्यामुळे देशभरात नावलौकिक मिळाला आहे. त्यांना कृषी संत म्हणूनही संबोधले जाते. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या  योजना राबविल्या आहेत. एवढेच नाही तर नाविन्यपूर्ण स्वरूपाच्या उपायोजना राबविल्या आहेत. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांची नाळ कायम जुळलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष समारोप करताना डॉ. बोन्नर म्हणाले,” शिक्षण, शेती, उद्योग, सहकार सिंचन अनेक ग्रामीण विकासाच्या बाबतीत विशेष लक्ष घालून सुधारणा केल्या आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारणांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत, असा ध्यास त्यांनी ठेवला होता, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी बालाजी शिंदे यांनी केले तर आभार डॉ. अंगद गडमे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...