पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज
दिनांक 26 जून 2025 रोजी
सकाळी 11:30 वाजता छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य संस्कृत
विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अभय पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे
म्हणून समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ अंगद गडमे, प्रा.
उध्दव होनमने यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू
महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. अंगद गडमे यांनी छत्रपती
शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम
राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे
यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत
त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता
सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment