Tuesday, September 16, 2025

होळकर महाविद्यालयात पालि विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


राणीसावरगाव  ( विश्वजीत राठोड )  : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पालि विभागाच्या वतीने  येत्या 27 सप्टेंबर 2025 रोजी पालि साहित्य आणि स्त्रीवाद या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकूलसचिव डॉ. रवी सरोदे  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रमजीवी समाज कल्याण मंडळाचे विधी सल्लागार शिवाजीराव हाके यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापरिषद सदस्य प्रा. डॉ. डी.एन.मोरे, संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या शिवाजीराव दळणर, पालि अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सूर्यभान बुवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर  उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी धम्म प्रशिक्षण केंद्र कलबुर्गी ( कर्नाटक ) यांच्या संस्थापिका भिक्खुणी सुमना थेरी ह्या बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्षा मधुमाला शिवाजीराव दळणर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर, प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर उपस्थित राहणार आहेत. या एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात पालि विषयातील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक, वाचकवर्ग, अभ्यासक शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत. या चर्चासत्रात सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. बालाजी गव्हाळे, सहसमन्वयक प्रा. डॉ. सारिका केदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...