मुलावर आई वडिलाचे प्रेम निस्वार्थी असून या प्रेमामध्ये कोणतेही आमिष नसते.त्यामुळे आई -वडिलांचा सांभाळ करणे आवश्यक असल्याचे आवाहन वसंतनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अधायासन केंद्र यांच्यावतीने सोमवारी दुपारी १ वाजता मातृ- पितृ देवोभाव या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रर्माचे अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ. शिवाजी दळणर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. बाळासाहेब मोहिते, संस्थेचे सचिव कृष्णा दळणर,पंचायत समितीचे सभापती आत्माराम सोन्नर यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अहिल्यादेवी व विठ्ठलदादा दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बदने म्हणाले, आजच्या पिढीने गरिबासाठी काम केले पाहिजे., हे काम काम कित असताना आपल्या आई- वडिलांना विसरता कामा नये, ज्यांना आई - वडील नाहीत त्यांना आई - वडिलांची किमत कळत असते. आई शिवाय आयुष्यात काहीही नाही,
असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी डॉ.दळणर म्हणाले, संस्कार महत्वाचे आहेत.शाळेत ज्ञान, घरात संकर होत असेल तर तोच पुढे ज्ञानेश्वर झाल्याशिवाय राहणार नाही. गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. मुलांनी शिक्षण घेणे आवश्यक असून लहान मुलांच्या समोर आई - वडील, सासा- सुना यांनी भांडण करू नये, असे, आवाहनहि डॉ.दळणर यांनी केले. यावेळी कृष्णा दळणर यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच प्रशांत वाघमारे, गंगाधर गव्हाने यांनी विठलदादा दळणर यांचा हाताने काढलेला फोटो डॉ. दलणार यांना भेट दिला. सूत्रसंचालन प्रा.तुकाराम बोबडे,डॉ. नार्सिंगदास बंग यांनी केले तर आभार डॉ. संतोष हंकारे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्टीत व्यक्ती व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजार होते.