Friday, November 10, 2017

राणीसावरगाव मधील विद्यार्थी राज्यात चमकला

राणीसावरगाव ( मंगेश भालेराव)

 
     मुंबई विद्यापीठा तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'सामान्य ज्ञान' स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय,राणीसावरगाव या विद्यालयातील इ. १० वी चा विद्यार्थी बालाजी राजेभाऊ राठोड हा प्रथम आला असून त्याला १०० पैकी ९८ गुण मिळाले. त्याच्या या यशाचे विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कौतुक केले एवढेच नाही तर,त्याला मुंबई विद्यापीठा तर्फे रू -२,५०,०००/- रूपयांचे बक्षीस मिळाले आहे व तसेच जिल्हाधिकारी श्री पी. शिवा शंकर,परभणी यांनीही त्याचा सत्कार केला आणि रू -५०,०००/- चे बक्षीस घोषित केले.
                             ही परिक्षा दि. २२ आॅक्टोबर 2017 रोजी घेण्यात आली होती. या विद्यार्थ्यांचा १० वी नंतर चा सर्व खर्च शासनातर्फे केला जाणार आहे असेही घोषित केले. त्याच्या या यशाचे प्राचार्य.डाॅ.शिवाजी दळणर,प्रा.उत्तम देवकत्ते,मुख्याध्यापक रोडे सर,रंगनाथ राठोड,कृष्णा दळणर,तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...