पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांचा वतीने दिनांक १६/१२/ २०१७ रोजी सकाळी ११ वाजता भारतीय संविधान जाणीव जागृती शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात सेमिनार हालमध्ये होणार आहे. या शिबीराचा लाभ नागरिकांनी घावा, असे आव्हान प्राचार्य शिवाजी दळणर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची उपस्थिती राहणार आहे. तर उदघाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विध्यापीठक चे कुलगुरू पंडित विद्यासागर तर अॅड. रंगनाथ राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये संविधानाचे अभ्यासक प्रा. अनंत राऊत यांचे “संविधान मुल्यांचा रुजवनुकीतील युवकांची जबाबदारी” यावर मार्गदर्शन होणार आहे. विचारवंत प्रल्हाद लुलेकर यांचे “भारतीय राज्यघटना नवे भान नवी जाणीव” या विषयावर होणार आहे. या कार्यक्रमाचे समारोप प्राचार्य शिवाजी दळणर, सुरेश वाघमारे, प्रो. एन. कांबळे यांचा हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वयक संतोष हंकारे तर प्राचार्य शिवाजी दळणर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावे, असे आवाहान तर प्राचार्य दळणर यांनी केले आहे.
