Tuesday, December 12, 2017

घटंग्रा विकासासाठी प्रयत्न करणार- संजय शिंदे

राणीसावरगाव (मंगेश भालेराव , सुशील तांबरे )

       
गंगाखेड तालुक्यातील घटंग्रा हे  विविध सुविधा देण्याचा मानस असल्याची माहिती बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक संजय शिंदे यांनी दिली.

      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालायतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियाना युवक शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर तर व्यासपीठावर सरपंच आत्माराम मोरे, उपसरपंच केशव पवार, मुख्याधाक मद्धेवाड, ब्रम्हदेव पवार, सखाराम इमडे मुख्याधापक जाधव, भगवान पवार, कृष्णा दळणर हजर होते.
     शिंदे म्हणाले,'' घटंग्रा गावातील आर्थिक समस्या सोडवण्याचा संकल्प केला.गावातील कर्जप्रकरणे,यासंदर्भातील बुलढाणा बँक आपल्याशी हात मिळवत आहे. येत्या दोन वर्ष घटंग्रा गाव दत्तक घेऊन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. दळणर म्हणाले," घटंग्रा गाव हे वारकऱ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात संस्कार आहेत. ज्या गावात संस्कार आहेत तेथे काही कमी पडणार नाही. ज्ञान आणि सुख हे प्रकार घरामध्ये वावरत नाहीत. मात्र घटंग्रागावामध्ये ज्ञान आणि सुख एकत्र नांदत आहेत. यातून चांगला विद्यार्थी समोर आल्याशिवाय राहणार नाही. गरीबीच भांडवल करू नये, भांडवल केल्यास हातामध्ये काहीच पदरी पडत नाही. त्यातून मार्ग शोधला पाहिजे. शेतकर्यांनी इतर शेतकऱ्यांचे अनुकरण केल्यास दारिद्र्याशिवाय त्यांना काहीच मिळत नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे. असे त्यांनी सांगितले. विविध मान्यवरांचे भाषणे झाली. मान्यवरांचे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय पाटील, सुत्रसंचलन डॉ. नर्सिंगदास बंग यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विठ्ठल डूमणर, डॉ. विश्वनाथ रासवे, प्रा. तुकाराम बोबडे, डॉ. उत्तम देवकत्ते, प्रा. दिपाली पांडे, प्रा. सारिका केदार, यांच्यासह प्राध्यापक व विध्यार्थ्यानी काम पाहिले. या कार्यकार्माला ग्रामस्त मोठ्या संख्यने उपस्थितीत होते. घेऊन विविध सुविधा देण्याचा मानस असल्याची माहिती बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक संजय शिंदे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...