Friday, December 15, 2017

राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरातून युवक घडतात - सौ नखाते

राणीसावरगाव (गंगाधर गव्हाणे, सुशील तांबरे)


शाळा,महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून युवक घडतात. यातून समाजकारण करत राजकारनासह आदर्श व्यक्ती होऊ शकतो, असे मत जि.प. उपाध्यक्ष सौ. भावनाताई नखाते यांनी आज व्यक्त केले.
      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने '' पर्यावरण व नैसर्गीक साधन संपतीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घटग्रा येथे युवक शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिकराव बडवणे, मुख्याध्यापक मदेवाड, सुरेखाताई आमले, सरपंच आत्माराम मोरे, पांडुरंग बडवणे, ब्रम्हदेव पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संत गाडगेबाबा आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम झाला. यावेळी नखाते म्हणाल्या ",ग्रामीण भागात विध्यार्थाना व्यासपीठ मिळत नाहीत. या शिबिरातून व्यासपीठ मिळू शेकतो. ज्या तरुणांना व्यासपीठ मिळतो, तो विध्यार्थ्री जीवानात यशस्वी होतो. समाजकारण, राजकारण, याच बरोबर स्वच्छता करणेही महत्वाचे आहे. येथील विध्यार्थाय्नी सात दिवसात गाव स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेचा आदर्श गावकर्यांनी घेतला पाहिजे. महिला संदर्भातील विवि योजना तसेच बचत गट, अंगणवाडी, शाळांच्या भौतिक सुविधेसाठी निधी देऊ यासाठी सरपंच मोरे यांनी भेटून आठवण करून दिली पाहिजे. येत्या दोन वर्षात वेळो वेळी घटांग्रा येथे ये-जा करीन आणि गावच्या विकासासाठी कटीबध राहील, असेहि त्यांनी सांगितले.  यावेळी प्राचार्य दळणर म्हणाले,''  घटांग्रा  हे गाव तीन वर्षासाठी दत्तक घेतले आहे. येथे विविध कामे करण्यात येणार आहेत. सात दिवसात शाहीर देविदास शिंदे लोकरंजनाचा कार्यक्रम प्रा. सुभाष ढगे यांनी राष्ट्र उभारणीत युवकांची  भूमिका सुलक्षणा कांबळे - कचरे यांनी पाल्याच्या विकास प्रक्रियेत पालकांची भूमिका, प्रकाश नानोर यांनी बहीणाबाई चोधरी व आजची स्त्री, प्राचार्य रंगराव सुपेकर यांनी ग्रामीण विकासात युवकांचे योगदान ,डॉ. दिनानाथ फुलवाडकर, अविनाश कासंडे, आत्माराम जाधव, भाऊसाहेब मकापल्ले, विठ्ठल सातपुते, नर्सिंगदास बंग, महेश जोशी, यशवंत मस्के, अशोक केंद्रे यांनी गावच्या कविता 'कविसंमेलन घेण्यात आले आहे. या काविस्मेलनाला प्रतीसात मिळाला. ह्र्दय रोग तपासणी शिबिरात १३३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. असे विविध कार्क्रामाचे रेलचेल घेण्यात आली आहे.  मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थाना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर कार्येक्रमाच्ये प्रास्ताविक प्रा. अभय पाटील. तर सूत्रसंचालन प्रा .बोबडे तुकाराम, आभार डॉ. विश्वनाथ रासवे यांनी मांडले. हा कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विठ्ठल डूमनर, डॉ. उत्तम देवकाते, विजयकुमार सोनर, डॉ. काशिनाथ जाधव, डॉ. रेणुकादास बोनर यांनी प्रयत्न केला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...