Friday, December 15, 2017

आज कर्मयोगिनी न्यूज वेबसाईटचे कुलगुरू डॉ.विद्यासागर यांच्या हस्ते उद्घाटन

राणीसावरगाव ( मंगेश भालेराव ) 
 
 
   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने कर्मयोगिनी  न्यूज वेबचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते १६ डिसेंबर  २०१७ रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष   अॅड.रंगनाथ राठोड, डॉ. अनंत राउत, डॉ.
प्रल्हाद लुलेकर डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. एन. व्ही. कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे. कर्मयोगिनी न्यूज वेबसाईट हे जगातील नागरिकांना वाचता येतो. हि वेबसाईट वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे.यामध्ये महाविद्यालया मधील विकासात्मक बातम्या आणि फोटो प्रकाशित केले जाते. आता पर्यंत ४५०० लोकांनी हि वेबसाईट बघितली आहे. बातमी प्रकाशित झाल्यानंतर २०० ते ३०० लोक न्यूज बघत असतात. गुगलच्या जाहिराती कर्मयोगिनी न्यूजवेबसाईटला मिळू शकतात.अशी माहिती वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...