भारत स्वतंत्र झाला असला तरी एक संघ नव्हता कारण अनेक पंत, धर्म, वंश, भाषा, आणि संस्कृती यामुळे तो वेगवेगळ्या धर्मात, पंतात, भाषेत विभागलेला होता. असा विभागलेला देश कधीच स्वतंत्र होणार नाही असे मत परदेशातील व देशातील अनेक तज्ञांनी त्यावेळी देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेकांनी वयक्त केले होते. परंतु डॉ..बाबासाहेब आंबेडकरानी मात्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहुपंतीय, बहुधर्मीय, बहुभाषीय, अशा देशाला एक संघ केले. राष्ट्र म्हणून या देशाची उभारणी केली. म्हणून भारतीय संविधान हे जगातील सर्व देशाच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ आहे असे मत कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आयोजित संविधान जाणीव जागृती शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्क्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्तिथी होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थचे अध्यक्ष अॅड.रंगनाथ राठोड, सरपंच सोमनाथ कुदमुळे, उपसरपंच भूषण गळाकाटू, सहसचिव कृष्णा दळणर हजर होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर वंदे मातरम महविद्यालयीन गीत, संविधान गीत, प्रतिमा पूजन, सत्कार समारंभ, कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर भारतीय संविधान जाणीव जागृती स्मरणीका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्यानंतर कर्मयोगिनी न्यूजब्लॉग चे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात नॅकचा बी+ दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शूटिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
कुलगुरू विद्यासागर म्हणाले,"
भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. भारत स्वतंत्र झाला तरी एकसंघ राहणार नाही कारण अनेक पंथ, भाषा-संस्कृती वेगवेगळी आहे असे मत परदेशातील व देशातील तज्ञांनी व्यक्त केले होते. यावर मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळागाळात जाऊन संविधान लिहले. समाजाला घटक ठरणाऱ्या विचाराला संविधान सहकार्य करत नाही वैज्ञानिक दृष्टीकोन घडवून आणण्यासाठी संविधनाचा वापर करण्यात आला. मात्र त्याकडे प्रभावीपणे लक्ष दिले गेले नाही. भारतीय संविधान लवचिकता किवां बदल करता येतो मात्र स्वतंत्र, समता, बंधुता, या घटने मध्ये बदल करता येत नाही. विकासाचा संबध शिक्षणाशी आणि संविधानाशी आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व पटलेले आहे. आता गती देणार शिक्षण आवश्यक आहे. कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षण व्यक्तीम्ह्त्व विकास क्षमता समाज भाषाच वापर केला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थांना इंग्रजीभाषा समजते, वाचता येते, मात्र बोलू शकत नाहीत. तेच महाविद्यालयाने शिकवले पाहिजे. युवकांचा प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णा हजारे असले पाहिजे. संविधानामध्ये हक्क, जबाबदाऱ्या, पुढच्या पिढीसाठी काय करावे हे-हि सांगितले जाते. असे हि सांगून ते म्हणाले," वैज्ञानिक गोष्टी निर्माण करण्याची गरज आहे.या वेळी दळणर म्हणाले," संविधानामुळे सर्व सामान्य नागरिकांना अभिमानाने जगता येते. लोकशाही संविधानावर चालते याचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख होणे गरजेचे आहे. लोकांच्या कल्याणासाठी संविधानची गरज आहे. जोपर्यंत युवकांना संविधान समजणार नाही तो पर्यंत युवकांचा विकास होणार नाही असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम तीन सत्रा मध्ये सुरु होता. दुसऱ्या सत्रामध्ये अनंत राउत यांनीसंविधान मूल्याच्या रुजवनुकीतील युवकांची जबाबदारी, तिसऱ्या सत्रा मध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी "भारतीय राज्यघटना नवे भान नवी जाणीव" या विषयावर व्याखान केले. तर समारोप सोहळ्या प्रसंगी प्रसिध्द विचारवंत डॉ.सुरेश वाघमारे यांनी "भारतीय राज्यघटना" या विषयावर सखोल अशी माहिती सांगितली. विद्यार्थी प्रशांत वाघमारे, सुशील तांबरे, मंगेश भालेराव, सुधीर उबाळे, समाधान नाटकर, सुनील रायबोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा महाविद्यालयाला भेट दिली. त्यानंतर सहभागी होणारे विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार, इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मराणीका देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष हंकारे तर सूत्रसंचालन प्रा.तुकाराम बोबडे, डॉ.नर्सिंगदास बंग, डॉ. बालाजी गव्हाळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.बालाजी शिंदे, प्रा.सारिका केदार, गोवर्धन जोगदंड, रमेश नरहिरे, प्रा.डॉ.उत्तम देवकत्ते मंगेश भालेराव, गंगाधर गव्हाणे,सुशील तांबरे यांनी प्रयत्न केले आहे.
