Wednesday, December 20, 2017

कर्मयोगीनी न्यूज वेबसाईटचे कुलगुरू विद्यासागर यांच्या हस्ते उदघाटन

राणीसावरगाव (गंगाधर  गव्हाणे,मंगेश भालेराव )
   
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने कर्मयोगिनी न्यूज वेबसाईटचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर आणि प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांच्या हस्ते नुकतेच झाले.  

    कर्मयोगिनी न्यूज वेबसाईट हि वृतपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदशनाखाली मंगेश भालेराव, सुशील तांबरे गंगाधर गव्हाणे, शितल,बोरगावकर  बी.ए.वृत्तपत्रविभागातील विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे. या वेबसाईट महाविद्यालयातील आणि राणीसावरगाव परिसरातील बातम्या प्रकाशित केल्या जातात, हि वेबसाईट जगात पाहता येते. प्रतिदिन ३०० नागरिक हि वेबसाईट पाहतात. आतापर्यंत ४५०० नागरिकानी हि वेबसाईट पाहिली आहे, यावरील बातम्या निशुल्क पाहता व वाचता येतात, या वेबसाईटचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रंगनाथ राठोड, सहसचिव कृष्णा दळणर, सरपंच कुदमुळे, उपसरपंच गळाकाटू, वृतपत्रविद्या विभागाचे डॉ, बालाजी शिंदे हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. तुकाराम बोबडे तर आभार डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृतपत्रविद्या विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थी व डॉ. उत्तम देवकत्ते, गोवर्धन जोगदंड, रमेश नरहिरे इत्यादींनी सहभाग घेतला.
                                                

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...