Wednesday, December 20, 2017

कुलगुरू पंडित विद्यासागर यांची वृत्तपत्रविद्या विभागाला भेट

राणीसावरगाव (गंगाधर गव्हाणे, प्रशांत वाघमारे)                                    
   

 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात वृतपत्रविभागाला नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर, सहसचिव कृष्णा दळणर, संस्थेचे अध्यक्ष अॅड रंगनाथ राठोड यांची उपस्थिती होती, मान्यवरांनी वृतपत्रविद्या विभागातील टी.व्ही, फ़ेक्स मशीन फोटो अल्बम,बूम,रेडीओ, हार्ड डिस्क, कार्यक्रमाची वही, अभिप्राय वही, कॅमेरे,संगणक, इत्यादी साहित्याची
माहिती घेतली, त्यानंतर कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी वृतपत्रविद्याचे विद्यार्थी ऐश्वर्या पवार, शितल बोरगावकर, गंगाधर गव्हाणे,मंगेश भालेराव, संजय रायबोले, सुशील तांबरे, प्रशांत वाघमारे आदी विद्यार्थ्यांसी बातमीचे मुल्ये, बातमी कसी करावी, तिचे प्रकार, आजची बातमी,वेब न्यूज आदि अंतर्गत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बालाजी शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन ऐश्वर्या पवार यांनी मांडले तर आभार मंगेश भालेराव यांनी मांडले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते.     
                    

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...