Friday, December 22, 2017

होळकर महाविद्यालयात शिवाजी शेंडगे यांना अभिवादन

राणीसावरगाव ( प्रणाली कदम )

    
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात समाजरत्न स्वर्गवासी शिवाजी बापू शेंडगे यांच्या सोळाव्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. होळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकत्ते यांच्या हस्ते स्वर्गवासी शिवाजी शेंडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनावर विशेष अशी महिती सांगितली. यावेळी प्रा. तुकाराम बोबडे, प्रा.संतोष हंकारे डॉ.श्रीहरी चव्हाण प्रा.अंगद गडमे डॉ.विठ्ठल डूमणर  यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तिथी होती.हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मंगेश भालेराव, प्रणाली कदम, गिरीधर यमगर आणि दिलीप वाडीकर यांनी प्रयत्न केले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...