Wednesday, December 27, 2017

होळकर महाविद्यालयात ऑनलाईन बँकिंगवर मार्गदर्शन

राणीसावरगाव (सुशिल तांबरे )
    
 गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात      अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ऑनलाईन बँकिंग व भिम अँपचे मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते हे होते. तर प्रमुख पाहुणे एस.बी.आय. चे अधिकारी भानुप्रकाश शर्मा, अविनाश राठोड यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शर्मा म्हणाले ऑनलाईन पत्रकारिता जेवढी महत्वाची आहे. यामुळे आपली मेहनत, पैसा, वेळ वाचतो. पैशाची देवाण घेवाण होत असते. पैसे काढण्यासाठी किवां इतरांच्या अकाउंटवरून पैसे काढण्यासाठी किंवा इतराच्या अकाउंटवर पैसे टाकण्यासाठी बँकेत जावे लागते. बँकेत न जाता व रात्री सुटीच्या दिवशी हि पैशाची देवाण घेवाण करता येते. त्यामुळे भिम अँपचे महत्व आणि लाईफ पॅालिसी संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रेणुकादास बोन्नर यांनी केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ  व वरिष्ठ महाविद्यालायतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...