Thursday, December 28, 2017

साहित्यात साचलेपणा आला की प्रवाह निर्माण होतात - डॉ.आचार्य

राणीसावरगाव (कृष्णा  सोनसळे ) :
   
साहित्य हे समाजाचा आरसा असतो.मानवी कल्याणाचा विचार भाषेच्या माध्यमातून साहित्यांच्या साह्याने मांडला जातो. साहित्यातून जीवन जगण्याची कला.संस्कृती खऱ्या अर्थाने शिकवली जाते, असे मत डी.जे. तरकरे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र आचर्य यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अतिथी व्याखान आयोजित करण्यातआले त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्य्कार्माच्या अध्यक्ष स्थानी मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. संतोष हंकारे यांची उपस्तिथी होती. यावेळी डॉ. आचार्य म्हणाले मानवी जीवनाचा अविभाज्य घाटक म्हणून साहित्यकडे पाहिले जातेपरंतु प्राचीन काळापासून साहित्याची निर्मिती झाली असली तरी साहित्यात तोच तो पण येत होता. देव-धर्म  ऐतिहासिक पुराणिक अशा विषयाला केंद्रस्थानी ठेवूनच साहित्याची निर्मिती होत होती.    त्यामुळे  साहित्यात  साचलेपणा आला आहे. या साचलेपणाला वाट,
मोकळी करून देण्यासाठी साहित्यामध्ये १९६० नंतर अनेक प्रवाह निर्माण झाले आहेत या प्रवाहनी मानवी जीवन गतिमान बनवली आहे. असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीहरी चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्तिथी होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश भालेराव, मोहिनी राठोड, सुजाता राठोड,  यांनी प्रयत्न केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...