Saturday, December 30, 2017

गेल्या वीस वर्षापासून कुस्ती विजेत्यांना प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर देतात बक्षिस

चाटोरी ( मंगेश भालेराव, सुशील तांबरे): 

     
           पालम तालुक्यातील चाटोरी येथे गहीनाथ यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धामध्ये गेल्या २० वर्षापासून शेवटची कुस्ती मधील विजेत्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांच्याकडून पाचहजार ऐकावन्न रूपये बक्षिस दिले जाते. यंदाही बक्षिसाचा मान परभणी येथील गोकुळ यांना मिळाला आहे.  चाटोरी येथे गहीनाथ यात्रेनिमित कुस्ती स्पर्धेचे आयोजन दर वर्षी केले जाते. यंदाही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये  लहान- मोठे 

स्पर्धकांनी सहभाग घेतला. अकरा रुपयापासून ५०५१ रुपयापर्यंतची कुस्ती घेतली जाते. शेवटची कुस्ती विजेत्यांना प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर  यांच्याकडून ५०५१ रुपयाची  रोक रक्कम दिली जाते. ही कुस्ती महत्वाची असते.  यंदा परभणी येथील गोकुळ यांनी नांदेड येथील ज्ञानेश्वर पाटील यांना चीत केले. या बक्षिसाचा मान गोकुळ यांनी संपादन केला. प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, पोलीस उपनिरीक्षक शर्मा, सभापती अन्नासाहेब किरडे, केशव गव्हाणे, साहेबराव किरडे आदी प्रतिष्ठीत नागरिकांच्या उपस्थितीत विजते गोकुळ यांना रोख रक्कम ५०५१  रुपये देण्यात आले आहे. हि स्पर्धा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी झुंबड केली. अशी माहिती डॉ.विठ्ठल डूमणर यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...