Saturday, January 6, 2018

दर्पणमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा प्रभाव : डॉ बालाजी शिंदे

राणीसावरगाव (ऐश्वर्या पवार )

   
 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पत्रामध्ये प्रारंभीपासून विचार आणि व्यक्तिमत्वाचा ठसा उमठविला असल्याचे प्रतिपादन वृतपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये वृतपत्रविद्या विभागाच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. उत्तम देवकते उपस्थितीत होते. तर प्रमुख पाहुणे डॉ. संतोष हंकारे, प्रा. तुकाराम बोबडे, डॉ. नर्सिंगदास बंग, प्रा. विजयकुमार सोन्नर यांची उपस्थितीत होती. मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले," दर्पण पत्राची भाषा जनसामान्याना समजावी म्हणून मराठी भाषा ठेवण्यात आली होती. ब्रिटीश सरकारला आपले मत समजण्यासाठी इंग्रजी भाषेतूनहि लिखाण केले जात असत. दोन कॉलमपैकी एक काँलम मराठी व दुसरा काँलम इंग्रजीमध्ये लिहित असत. वृतपत्रविद्याची माहिती लोकांना नव्हती हि माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी दर्पणच्या माध्यमातून लोकांची आकलन क्षमता वाढीवण्यासाठी प्रयत्न केला. पत्रकार बरोबर जाभेकर यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवर्ती प्रकाशित केली. दर्पणचा वापर प्रबोधनासाठी, विधवांचा पुनर्विवाह आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा वापर करण्यासाठी केला आहे. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजापर्यंत पोहचला पाहिजे असा उद्देश ठेऊन काम करत असत त्यांच्या जीवन पत्रकारिता, समाजकार्य, शिक्षण, इत्यादी विषयावर त्यांनी प्रभाव टाकला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद गड्मे यांनी केले. सूत्रसंचालन सुशील तांबरे यांनी केले. आभार शीतल बोरगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...