राणीसावरगाव ( शितल बोरगावकर,प्रणाली कदम,पल्लवी शिंदे )
 |
| छायाचित्र :रियाज तांबोळी |
परकीयांचे साम्राज्य असताना स्वताचे स्वराजे निर्माण करण्याचे स्वप्न राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांनी साकार केले त्यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आव्हान राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.विजयकुमार सोन्नर यांनी येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ,गणेश माने यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. यावेळी विजयकुमार सोन्नर म्हणाले बाराशे वर्षापासून देशामध्ये परकीयांचे जुलूम,अन्याय,अत्याचार होते.परकीयांना शह देण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. त्यांच्या माध्यमातून मोगलशाही,आदिलशाही,कुतुबशाही,ब्रिटीश यांच्या विरोधात अनेक लढाया केल्या.लढाया करत असताना शक्ती च्या वापरा बरोबर युक्ती चा वापर करण्यात आला. अनेक लढायात त्यांना यश मिळाले आहे त्यांच्या पाठीमागे राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन होते. आजच्या विध्यार्थ्यानी पालकांनी मुलाला घडविण्यासाठी जिजाऊ सारखे मार्गदर्शन करण्याची आवशकता आहे. जी माता जिजाऊ चा आदर्श घेईल त्यांचा आपत्य हुशार होईल असे
 |
| छायाचित्र : समाधान नाटकर |
त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.खोमणे डॉ.माने विध्यार्थिनी शितल बोरगावकर,शिवकन्या पौळ यांनी भाषणे केली. यावेळी 'युवकांचे प्रेरणास्थान' भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. या भित्तीपत्रकाचे संपादकीय मंडळ अध्यक्ष-क्रांती मस्के, उपाध्क्ष्य- शितल बोरगावकर,सचिव-कृष्ण सोनसळे, सदस्य-हनुमान ठाकूर, गणेश बोबडे,रंगनाथ जाधव. यांचा सहभाग होता. या कार्यकामाचे प्रस्थाविक संस्कृत विषयाचे प्राध्यापक शंकर घाडगे यांनी केले तर आभार लोकप्रशाशन विभागाचे विभाग प्रमुख वसंत सरवदे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोवर्धन जोगदंड गंगाधर गव्हाणे, समाधान नाटकर, किरण खाकरे, ऐश्वर्या पवार,रियाज तांबोळी, यांनी पुढाकार घेतला. या कार्यकार्माला होळकर महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठमधील कर्मचारी मोठया संख्येने हजर होते.