Thursday, January 18, 2018

गंगाखेड - राणीसावरगाव रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

राणीसावरगाव (शितल बोरगावकर) :

     गंगाखेड - राणीसावरगाव रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात आले. मात्र अजूनही खड्ड्याचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्याचे  डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा, अशी घोषणा केली. मात्र परभणी जिल्ह्यातील गंगाखेड - राणीसावरगाव रस्त्यावर खड्याचा सुसुळट आहे. येथे चांगला रस्ता दाखवा बक्षीस मिळवा, असे म्हणावे लागेल. गेल्या दोन महिन्यात गंगाखेड - राणीसावरगाव रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्च्याची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्यातील खड्डे बुजविले हे खड्डे बुजविताना डांबर व गीटीचे प्रमाण अल्प वापरले आहे. त्यामुळे दोनच महिन्यात खड्याला सुरवात होत आहे. सध्य जेसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी मोठे अवघड झाले आहे. या खराब रस्त्यामुळे वाहने राणीसावरगावकरांचे पाठीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन राणीसावरगावचा रस्त्याचे डांबरीकर करावे, अशी मागणी होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...