Wednesday, February 14, 2018

राणीसावरगाव परिसरात गारांचा पाऊस

राणीसावरगाव (मंगेश भालेराव):


     
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव परिसरामध्ये वादळी वारयासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये घरांची पडझड, पक्षी, जनावरांची हानी झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होत. या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील विविध भागात वादळीवार, पाऊस, गारपीट झाली. राणीसावरगाव परिसरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला अचानक ढग येवून पावसाला सुरुवात झाली.पावसाचे रुपांतर गारामध्ये झाले. २० मिनिट गारांचा वर्षाव सुरु होता. या दरम्यान अनेक घरावरची पत्रे उडाली, विविध जनावरे घायाळ झाली. शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नुकसान झाली. यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, टरबूज, ज्वारी, आंब्याचा मोहर, भाजीपाला इत्यादीचा समावेश आहे. या शेतीचे पंचनामे तहसील प्रशासनाने करावी, अशी मागणी राणीसावरगावकर करीत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...