Monday, April 16, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनाचे मुक्तिदाते - डॉ.शिंदे

राणीसावरगाव (मंगेश भालेराव, सुशील तांबरे):
     
     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रवास व कार्य हे या देशातील प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये जन्म घेऊन या देशातील सर्वोच्च उच्च अशा पदापर्यंत पोहचून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान निर्मितीचे कार्य केले. भारत देशाला एक राष्ट्र म्हणून त्यांनी उभे केले. म्हणून हे कार्य देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती म्हणून ते वंदनीय नाहीत तर ते या देशातील खऱ्या अर्थाने बहुजांचे मुक्तिदाते होते, असे मत प्रा.डॉ.बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अद्यासन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आनंद घन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अद्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.संतोष हंकारे हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.आनंद घन, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषा वार प्रांत रचना या विषयावर आपले विचार व्यक्त केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा आणि अखंडतेचा विचार करताना राज्य घटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचना घटना परिषदेने मान्य केल्या. तसेच भारतात अनेक संस्थानिकांची राज्य होती. ती स्वताला सर्वोभोम समजत होती. त्यामुळे ती सतत त्यांच्या अस्तित्वाची मागणी करत होती. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व जठील प्रश्न सोडविण्याच्या द्र्ष्टीकोनातून भारतीय राज्यघटनेद्वारे संघराज्य स्थापन केले. भारत हे एक अखंड राष्ट्र एकसंघ म्हणून उभे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषा वार प्रांत रचणे बाबत व एकात्मता आणि सुरक्षितता महत्वाची मानली असे प्रा.आनंद घन यांनी सांगितले. या प्रसंगी प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी डॉ.संतोष हंकारे यांना त्रेचाळीश ग्रंथदान केले. तसेच प्रा.सारिका केदार,प्रा.शंकर घाडगे यांनी ग्रंथदान केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी पाली विभागाच्या वतीने बुद्ध पूजा पाठ घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शंकर घाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे, यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिल तांबरे, ऐश्वर्या पवार, गंगाधर गव्हाणे,मंगेश भालेराव यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्तीत होते. 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...