पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये महिला विकास समिती आयोजित 'जागतिक महिला दिन' कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते सर हे होते तर प्रमुख पाहुणे मराठी विभाग प्रमुख डॉ.संतोष हंकारे सर होते. महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना महिला विकास समितीच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. महिला दिनानिमित्य अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस.पी.
खंदारे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात शितल बोरगावकर आणि पिंकू मिठ्पल्ले यांनी आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. निशा क्षिरसागर या विद्यार्थिनीने केले तर आभार कु.ऐश्वर्या पवार यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी,प्राध्यापक,मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.केदार एस.व्ही.यांनी प्रयत्न केले.