राणीसावरगाव (मंगेश भालेराव):
वै.साळूबाई विठ्ठलराव दळणर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता हृदयरोग, नेत्र तपासणी, नदी नांगरीकरणाचा अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथे करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली.
ते म्हणाले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नागपूर येथील पद्मश्री
पुरस्कार प्राप्त खासदार डॉ.विकास महात्मे, प्रमुख पाहुणे म्हणून शहदाचे
नगराध्यक्ष तथा जलतज्ञ मोतीलाल पाटील, गंगाखेडचे आमदार डॉ.मधुसुदन केंद्रे,
पाथरीचे आमदार बाबाजानी दुराणी, अहमदपूरचे माजी आमदार बाबासाहेब पाटील,
यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगून ते म्हणाले,'' हृदयरोग तपासणी
शिबिरात हृदयाचे ठोके मोजणे, रक्तदाब, छातीची पट्टी, वजन तपासणी, शरीर
तापमान तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, शरीरातील ऑक्सीजन तपासणी,
वैद्यकीय आहारविषयक सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी माधवबाग येथील तज्ज्ञ
डॉ.आशिष सोमानी, डॉ. प्रशांत माकुंडी यांची उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर पाथरीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विजयसाई शेळके, डॉ. ज्योती शेळके,
उदयगिरी लायन्स क्लब उदगीर येथील अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉक्टर उपस्थित
राहणार आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे
आव्हान प्राचार्य डॉ.शिवाजीराव विठ्ठल दळणर आणि कृष्णा शिवाजीराव दळणर
यांनी केले आहे.
