Saturday, April 28, 2018

ग्रामीण भागात आरोग्य शिबीर होणे काळाची गरज - आ.डॉ.मधुसुधन केंद्रे

राणीसावरगाव (मंगेश भालेराव, सुशील तांबरे):
आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्य ग्रामीण भागात प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी ह्द्यरोग आणि नेत्र तपासणी शिबिरे घेऊन आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.तो प्रयत्न महत्वपूर्ण असून अशी अनेक शिबिरे ग्रामीण भागात होणे काळाची गरज आहे असे प्रतीपादन आ.डॉ.मधुसुधन केंद्रे यांनी आज येथे केले.
                                        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वै.साळूबाई विठ्ठलराव दळणर यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
नेत्रतज्ञ डॉ.विजय शेळके, डॉ.ज्योती शेळके,नगरसेवक विजय घोरपडे,जि. प.सदस्य वाघमारे, डॉ.आशिष सोमाणी, डॉ.अमोल देशमुख, डॉ.टोपे, डॉ.कृष्णा मुरारी, डॉ.कैलास गुरव, डॉ.विलास वाघमारे, सुनिता बाबर, दामिनी खंदारे, कृष्णा दळणर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वै.साळूबाई विठ्ठलराव दळणर यांच्याप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदयगिरी लायन्स क्लब व माधवबाग यांच्या वतीने तीनशे रुग्णाची ह्द्यरोग आणि नेत्र तपासणी करण्यात आली आहे. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी आ.केंद्रे म्हणाले ग्रामीण भागात मोफत
पु.अ.हो. महाविद्यालयात छातीची पट्टी तपासताना
 आ.डॉ.मधुसुधन केंद्रे व प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर
आरोग्य शिबिराचे आयोजन करून गरिबांना मदत होत आहे. पैसे अभावी महिला रुग्णालयात जात नाहीत.यातच आजार वाढतो शेवटी खर्च जास्त लागत असल्याने उपचार घेणे टाळतो.अशा रुग्णांसाठी हि शिबिरे जीवदान ठरत आहेत.आई- बाबांच्या मृत्यूनंतर हि असे उपक्रम चालू ठेवणे कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ.दळणर म्हणाले ग्रामीण भागातील महिला रुग्नालयात जात नाहीत त्यांच्यासाठीच मोफत शिबिराचे आयोजन केले.घरातील माणूस सधृढ राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी
पु.अ.हो. महाविद्यालयात नेत्र तपासणी करण्यात आली
सांगितले .यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.तुकाराम बोबडे तर आभार प्रा.विजयकुमार सोन्नर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या विकासासाठी दहा लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...