Tuesday, August 14, 2018

शिक्षकांनी कौशल्य विकास आत्मसात करावे- कुलगुरू विद्यासागर

राणीसावरगाव (वैभव आदोडे) 

 शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानचा वापर करून विद्यार्थांना शिकवले पाहिजे. विविध कौशल्याच्या आधारे विद्यार्थ्यांना  शिकवण्याची आवश्यकता असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांनी दिली
             पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर  महाविद्याल्यामध्ये केडीसी आणि वृत्तपत्रविद्या विभागच्या वतीने  सेमिनार हॉलमध्ये कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.  या वेळी ते म्हणाले, “ मा.कृषीमंत्री शरद पवार यांनी विद्यापीठ विकासासाठी ५० लाखाचा निधी दिला. त्यातून अनेक विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, असे सांगून ते म्हणाले,’’क्रीडामध्ये खो-खो, स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर विजय झाला. विद्यार्थांमध्ये संपूर्ण क्षमतेने
विद्यार्थी उतरला तर विद्यार्थ्यांसहित विदयापिठाच नाव जगात होईल. आपल्या विदयापिठामध्ये एकुण १०० परदेशी विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. हि संख्या वाढीसाठी गुणवत्ता आवश्यक आहे. प्रगत देश्यातील विद्यार्थ्यांना स्वा.रा.ती.म. मध्ये प्रवेश घेतला पाहिजे. त्यासाठी प्रगत शिक्षण देणे आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये गुणवत्ता, शैक्षणिक कौशल्यविकास शिक्षण, शिक्षण अध्यापन करणे आवश्यक आहे. ‘हिप्पा आणि रुस्सा’ या संस्थेकडून आर्थिक मदत मिळालेली आहे. त्याचा वापर योग्य करण्यात येणार आहे. शिक्षकांनी पुस्तके लिखाण, संशोधन करणे आवश्यक आहे. पुढील ध्येय ठरवून अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी कँरीऑन मिळावे. ‘एटीकेटी’ मिळावी, गुण वाढवून मिळावे हे प्रश्न न करता शिक्षकांनी शिकवले नाही, शिक्षक वेळेवर येत नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, अश्या तक्रारी केल्या पाहिजे. या वेळी विध्यार्थी मंगेश भालेराव, सोनी पवार, वैभव आदोडे यांनी कुलगुरूंना प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कुल्गुरुनी दिले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील गवर्धन जोगदंड, उपप्राचार्य डॉ.उतम देवकत्ते, प्रा.नरहिरे, विध्यार्थी समाधान जाधव, तांबोळी अश्विनी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येत  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...