Wednesday, August 1, 2018

अण्णाभाऊचे साहित्य समाजाला जगण्याची प्रेरणा- डॉ.हंकारे

राणीसावरगाव (सोनी पवार)  
  
छायाचित्रकार: मंगेश भालेराव
 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तळागाळातील समाजापर्यंत पोहचल नाही,तर समाज निर्मितीसाठी अण्णाभाऊ साठे यांच साहित्य महत्वाच असल्याच प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉ.संतोष हंकारे यांनी केले.

         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व केसरीचे संस्थापक संपादक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्य व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संतोष हंकारे यांची उपस्तिथी होती.
छायाचित्रकार: मंगेश भालेराव
प्रारंभी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.हंकारे म्हणाले," हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पवाडा लिहण्याच काम केले. रशिया मध्ये शिवाजी महाराजावरती पवाडा गाऊन त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. त्याचं साहित्य समाज उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रकाश चोधरी यांनी केले तर आभार इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश माने यांनी केले. या प्रसंगी प्रा.डॉ.विश्वनाथ रासवे, डॉ.वसंत मोटेगावकर, प्रा.तुकाराम बोबडे, प्रा.दिपाली पांडे, प्रा.सारिका केदार, प्रा.सोमनाथ अहिरे, प्रा.अंगद गडमे यांची उपस्तिथी होती. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.  

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...