Thursday, October 11, 2018

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरु

राणीसावरगाव (मंगेश भालेराव)  
  
 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या हिवाळी २०१८ च्या लेखी परीक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथे सुरु आहेत. बी.ए, बी.ए.आर.एम, बी.ए.एम.सी.जे, या शाखेच्या परीक्षा असून, या परीक्षेत ४६८ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा सुरु आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात विद्यार्थांना पूर्ण तपासून परीक्षा केंद्रावर सोडण्यात येत आहे. विद्यार्थांना तपासण्यासाठी स्थानिक दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली असून दक्षता पथकाचे काम प्रा.डॉ.बालाजी शिंदे, प्रा.दिपाली पांडे, प्रा.अंगद गडमे हे पाहत आहेत.कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबिवली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी दिली. या परीक्षेचे केंद्रप्रमुख- प्रा.डॉ.उत्तम देवकते, साह्यक केंद्रप्रमुख- प्रा.आनंद घन, साह्यक- प्रा.डॉ.रेणुकादास बोन्नर यांनी काम पहिले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...