स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रमाकांत घाडगे यांनी राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला मंगळवारी दुपारी १२ वाजता भेट दिली. डॉ. घाडगे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील अत्याधुनिक ग्रंथालय पाहून भारावले. येथील पुस्तकांची पाहणी केली . त्यानंतर संगणक लॅब,व्यायामशाळा, लँग्वेज लॅब, संगीत विभाग, सेमिनार हॉल,वृत्तपत्र विद्या विभाग, सैनिक शास्त्र विभाग, गृहविज्ञान विभाग, इंडोअर हॉल, सौर ऊर्जा प्रकल्प,मोफत वायफाय विद्यार्थ्यांसाठी पाहुण डॉ. घाडगे चक्क भारावले! डॉ. रमाकांत घाडगे आणि डॉ. आर.ए. धनेश्वर यांचा शाल,श्रीफळ, स्मुती चिन्ह आणि भारतीय राज्य घटनेचे पुस्तक देऊन प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment