Tuesday, September 18, 2018

होळकर महाविद्यालयात तेजस्विनी पौळ यांना ‘कर्मयोगी माय दादा गुणवंत पुरस्कार’ प्रदान

राणीसावरगाव - सुनिल रायबोले     
   
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील उन्हाळी २०१८ बी.ए.च्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी चंद्रकांत पौळ हिने मिळविला आहे. प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांच्या हस्ते तिला ‘कर्मयोगी माय दादा गुणवंत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये  रोख रक्कम व स्मृती चिन्ह आणि गौरवपत्र असे आहे.

       
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामाध्ये 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण, गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संथेचे अध्यक्ष अॅड. रंगनाथ राठोड, उपप्राचार्य डॉ. उत्तम देवकत्ते, मुख्याध्यापक रोडे, यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांच्याहस्ते ध्वजारोहण फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत संगीत विभागाच्या वतीने सादर केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून बी.ए. तृतीय परीक्षेमध्ये सर्व व्दितीय क्रमांक मिळविणारी तेजस्विनी चंद्रकांत पौळ हिच्यासह आई गयाबाई चंद्रकात पौळ, वडील चंद्रकांत विठ्ठलराव पौळ, पती मुंजाजी मंचकराव भेले, सासरे मंचकराव रंगनाथराव भेले, काकू रशिका नारायण पौळ आणि भाऊ एकनाथ चंद्रकात पौळ यांच्यासह असा परिवार उपस्थित होता. तिला होळकर महाविद्यालयातील ‘कर्मयोगी माय दादा गुणवंत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेकडून केरळ पूरग्रस्तांसाठी राणीसावारगावातून मदत निधीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीतून ११ हजार ८३८ रुपये जमा करून त्याचा चेक प्राचार्यांना दिला.
     
          मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेतील खेळाडू शिवशंकर दत्ता हाके, गणेश दगडू हाके, रामदास बालाजी हाके, नरसिंग संग्राम हाके, समाधान पंढरी हाके, यांचा गौरव करून प्रमाणपत्र देण्यात आले. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये पवन प्रकाश बुगनर, वैजनाथ राजेभाऊ जाधव, गोविंद राजेभाऊ जाधव, तर तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेमधील विजयी खेळांडू पवन प्रकाश चीपटे, सचिन पांडुरंग जाधव, रमण राजकुमार नरवटे, पवन प्रकाश बुगनर, शंतनू शंकरराव भिमनपल्लेवार, रोहित दिलीप वाडीकर, विजय बाबू डोईफोडे, वैजनाथ राजेभाऊ जाधव, प्रशांत बालाजी गुडदे, ऋषिकेश परसराम भुत्ते यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्यातील मानवत येथे जिल्ह्यात प्रथम क्रमांक कबड्डी स्पर्धेमध्ये मिळविला. या खेळांडूची नावे पुढीलप्रमाणे परमेश्वर सुभाष चव्हाण, अनिल शेषेराव राठोड, आनंद उद्धव जाधव, संदीप मारोती बुधवारे, संतोष ग्यानदेव जाधव, दिपक देविदास जाधव, अंकुश चव्हाण, धर्मराज विठ्ठल नामपल्ले, ईश्वर साहेबराव चव्हाण, करण चंद्रकांत माने, गणेश बाळासाहेब
पौळ, नरसिंग लक्ष्मण बिडगर, यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.नरसिंगदास बंग यांनी केले तर आभार क्रीडासंचालक डॉ.विठ्ठल डूमणर यांनी मानले.या कार्यक्रमाचे चित्रीकरण चंद्रकांत धनगरे आणि छायाचित्र पूजा राठोड यांनी काढले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...